वन विभागात वनरक्षक सरळसेवा भरती | Vanrakshak Bharti 2023 | Van Vibhag Bharti 2023

 वन विभागातील वनरक्षक (गट क) भरती प्रक्रिया सन २०२३



   वनविभागातील वनरक्षक (गट क) पदे सरळसेवेने भरावयाची आहेत. त्यासाठी अर्हता धारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात फक्त ऑनलाईन पध्दतीने www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर भरती प्रक्रिया (Recruitment) या टॅबमध्ये उपलब्ध लिंकवर मागविण्यात येत आहे. सदर संकेतस्थळावर सविस्तर जाहीरात उपलब्ध असून उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक समजून घेऊनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. प्रस्तुत पदांकरिता केवळ उक्त संकेतस्थळावरील लिंकवर दिहित ऑनलाईन पद्धतीनेच केलेले अर्ज व ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. भरती प्रक्रिये दरम्यान वेळोवेळी संकेतस्थळ पाहून भरती प्रक्रियेच्या माहितीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील.


  • विभागाचे नाव - महाराष्ट्र वन विभाग
  • वयोमर्यादा -  18 ते 27 व 32 वर्षापर्यंत
  • कॅटेगरी - महाराष्ट्र शासन सरकारी नोकरी
  • कोण अर्ज करू शकतात - महाराष्ट्रातील उमेदवार
  • अनुभव -  फ्रेशर असलेले उमेदवार पात्र 
  • Gender Eligibility - Male & Female
  • अर्ज पद्धती - ऑनलाईन
  • वेतन - 21,700 ते 69,100
  • अर्ज फी - खुला प्रवर्ग - 1000/-, राखीव प्रवर्ग - 900/-
  • भरती - सरळसेवा भरती (पर्मनंट)
  • निवड प्रक्रिया - ऑनलाईन परीक्षा (CBT) TCS मार्फत
  • Start Date - 10 जून 2023
  • Last Date - 30 जून 2023
  • नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत
  • अधिकृत वेबसाईट - www.mahaforest.gov.in
  • जागा - 2138 जागा
  • पदाचे नाव - वनरक्षक


ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत
दिनांक १०/६/२०२३ दिनांक ३०/६/२०२३


भरतीकरीता उपलब्ध पदे व वेतनश्रेणी :-


अ. क्र. पदनाम वेतनश्रणी  भरतीकरीता एकूण उपलब्ध पदे
वनरक्षक (गट-क) S-७ रु.२१७००-६९१०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते (सातव्या वेतन आयोगानुसार) २१३८


वरील पदांचा वनवृत्तवार तपशील सोबतच्या परिशिष्ट १ ते ११ मध्ये नमुद केल्याप्रमाणे आहे.

शैक्षणिक पात्रता :- 

  1. उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१२ वी) ही विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.
  2. अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वी) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.
  3. माजी सैनिक असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वी उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.
  4. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले चनखबरें व वन कर्मचा- यांचे पाल्य असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वी) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील. (टिप:- नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले दनखबरें व वन कर्मचा-याचे संबंधात वरील प्रयोजनाकरिता शासकीय वैद्यकीय अधिकारी आणि पोलि खात्यातील घटनेच्या कार्यक्षेत्रातील सक्षम पोलिस अधिकारी यांचे कडून निर्गमित केले प्रमाणपत्र विचारार्थ घेण्यात येईल.)
  5. अर्ज स्विकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
  6. मराठी भाषेचे ज्ञान (लिहीणे, वाचणे व बोलणे आवश्यक आहे.


परीक्षा शुल्क :-

उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी खालीलप्रमाणे परीक्षा शुल्क भरणा करावा लागेल.


प्रवर्ग शुल्क
अमागास रु. १०००/-
मागासवर्गीय / आ.दु.प/ अनाथ रु.९००/-
माजी सैनिक

माजी सैनिक यांना शासन निर्णय क्र. आरटीए-१०७२/०/४८२/XVI-A, दिनांक ३/७/१९८० नुसार परीक्षा शुल्कातून सूट देण्यात येत आहे.
परीक्षा शुल्क ना परतावा (Non-refundable) आहे.

निवडीची पध्दत :-  

ऑनलाइन पध्दतीने सादर केलेल्या अर्जातील माहितीनुसार पात्र ठरणा-या C. उमेदवारांची महसूल व वनविभाग, शासन निर्णय क्रमांक एफएसटी-०६/२२/प्र.क्र.१२८/फ-४, दिनांक २७ / १२ / २०२२ व शासनाचे अनुषंगिक दिशानिर्देशानुसार निवड करण्यात येईल. निवडीबाबत टप्पे यासोबत परिशिष्ट १२ म्हणून जोडले आहे.

अ.क्र. विषय गुण
मराठी ३०
इंग्रजी ३०
सामान्य ज्ञान ३०
बौधिक चाचणी३०
  • ऑनलाईन परीक्षेतील प्रश्नांचा स्तर हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१० वी) परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील. सामान्य ज्ञान या विषयामध्ये राज्याचा भूगोल, सामाजिक इतिहास, वन, पर्यावरण, हवामान इ. बाबींचा अंतर्भाव राहील.
  • परीक्षा की ऑनलाईन पध्दतीने (Computer based test) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात आयोजित करण्यात येईल.
  • परीक्षा ही २ तासाची राहील.
  • उमेदवाराने ऑनलाईन परीक्षेत किमान ४५% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. ४५% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणारे उमेदवारांपैकी गुणवत्तेनुसार वनरक्षक पदाकरीता पुढील टण्याकरीता पात्र राहतील. ४५% पेक्षा कमी गुण मिळविणारे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होतील.

ऑनलाईन परीक्षेचा निकाल :-

वनवृत्तनिहाय ऑनलाईन परीक्षेचा निकाल वेबसाईटवर प्रसिध्द प्रक्रियेतून बाद होतील. उमेदवाराने ज्या वनवृत्तासाठी अर्ज केला आहे त्याच वनवृत्तासाठी त्याचा विचार करण्यात येईल

NOTICE

अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी. नोटिफिकेशन ची लिंक खाली दिली आहे.



सूचना :- उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.



दररोज जॉब अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक वर क्लीक करून जॉईन व्हा.
Previous Post Next Post